सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाणून घेतल्या वाचकांच्या व्यथा

परभणी प्रतिनिधी 

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणार आपना कॉर्नर भागातील मौलाना आझाद सार्वजनिक वाचनालय समस्याच माहेरघर बनले असल्याचे दिसून आले. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मंगळवारी वाचनालयास भेट देत वाचकांच्या समस्या जाणून घेतल्या.

परभणी शहरातील आपणा कॉर्नर भागात महानगरपालिकेचे वाचनालय आहे. मौलाना आझाद असे या वाचनालयाचे नाव आहे. या वाचनालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांना संपर्क साधून वाचनालयास भेट द्यावी व आमच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी विनंती केली होती .यावरून आज मंगळवारी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर वागलगावचे माजी सरपंच नारायणराव धनवटे, मशनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, ज्येष्ठ नेते विक्रम बाबा इमडे यांनी दुपारी वाचनालयास भेट दिली .वाचनालयाचा परिसर व आतील भागात फिरून या भागाची पाहणी केली .उपस्थित वाचक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाचकांनी वाचनालयाचा वेळ वाढवणे, स्वच्छता ठेवणे ,शनिवारी व रविवारी सुद्धा वाचनालय सुरू ठेवणे ,नवीन पुस्तके येऊनही ती कुलपात ठेवल्याने वाचायला मिळत नाहीत, सायंकाळसाठी या ठिकाणी दुर्गंधी रोखण्यासाठी वाचमेन नियुक्त करावा, आदि मागण्या उपस्थितांकडे केल्या. आठ दिवसात या वाचनालयातील वाचक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू व यशस्वी होउ असा विश्वास सखाराम बोबडे पडेगावकर यांनी उपस्थितांना दिला.