तरुण रक्ताला आवर कोन घलणार हा प्रस्न समाजापुढे आवासुन उभा आहे. एका मोटरसायकल वर तिघेजण बसुन धुमस्टाईल ने गाडी चालवीत असताना कोलाड, रोहा रोडवर रोठ गावच्या हद्दित मुठवली येथील लक्ष्मण नारायण शेळके या 65 वर्षीय इसमाला मोटरसायकल ची धडक बसल्याने ते जबर जखमी झाले अखेर मृतू शी झुंज देत 8 सप्टेंबर रोजी नायर हॉस्पिटल मधे निधन झाले. गणपती सनात अतिशय दुखद घटना घडली अशा रोड रोमियो मुळे अनेकाना आपला विनाकारण जीव गमवावा लागत असल्याची चर्चा नागरिकांत एकावयास मिळत आहे.
कोलाड रोहा रोड चे रुंदीकरण झाले आहे. त्यामूळे रस्ता मोकळा व रूंद झाला आहे. त्यामूळे वाहन चालक सुसाट वेगाने गाडी चालवीत असतात.रस्ता अरुंद होता त्यावेळी अपघात होत होते मात्र रस्ता रूंद झाल्याने अधिक अपघात वाढले आहेत याला कारण वाहने अधिक वेगाने चालवली जात आहेत. सुदर्शन कॉलनी समोर रोहा रोड लगत भाजी व्यवसाय करणारे लक्ष्मण नारायण शेलके यांचा 3 सप्टेंंबर रोजी या रोडवर मोटारसायकल स्वराकडून जोरदार धडक मिळाल्याने 5 दिवस हॉस्पिटल मधे उपचार करित असताना मृतू झाला सदर धडक त्यांच्या जिवारी बसली त्यातून ते उठलेच नाहित.
ते शिंदे मुठवली येथील रहीवाशी होते. वारकरी सांप्रदायिक होते. मनमिळाऊ स्वभाव व कस्टालू होते. ते आपल्या मुलाना भाजी धंद्यात मदत करित असत. एका चांगल्या धडधाकट माणसाचा धुमस्टाईल तरुणाई मुळे मृतू झाला. त्यामूळे रोहा रोड वर प्रवास करित असलेल्या प्रवाशी वर्गात भितिचे वातावरण तयार झाले आहे. 2 महिन्यपुर्वी कोलाड येथील शेख नामक इसमाचा असाच दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. त्यामूळे भविश्यात रोहा तालुक्यात धुम स्टाइल रोड रोमियोंचा बंदोबस्त करने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे रहाणार आहे