सोलापूर – दुचाकी वरून जाताना कुत्रा आडवा आल्याने घसरून झालेल्या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावले. ही घटना वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. 

गणेश बापू जाधव (वय ५५ रा. वडाळा) असे मयताचे नाव आहे. ते सोमवारी (ता.22) सायंकाळच्या सुमारास घरातून गावातील पेट्रोल पंपाकडे निघाले होते. वाटेत कुत्रा आडवा आल्याने ते दुचाकीवरून घसरून खाली पडून जखमी झाले होते. त्यांना वडाळा येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मरण पावले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.