गणेशउत्सव नागरिकांनी शांततेत साजरा करावा..... उपविभागीय अधिकारी.माणिक आहेर
वैजापूर /गंगापूर शैलेंद्र खैरमोडे
अवघे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून गंगापूर वैजापूर पोलिसांनी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी गणेशोत्सव मंडळांनी पोलीस अधीक्षक मनिष कलवनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूर शहरातील शांतता कमिटीच्या बैठकीत केली.
आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गंगापूर शहरातील गणेशोत्सव मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून अनेक जण शेवटच्या टप्प्यातील तयारीत आहेत. अशातच पोलिसांकडून गंगापूर वैजापूरच्या गणेश मंडळासाठी बैठक गंगापूर येथील शिवकृपा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यामध्ये गणेशोत्सवाची एक खिडकी योजना, गणेश मिरवणुकीसाठी नियम आदींचा उहापोह करण्यात आला तर डीजे लावण्यावर ठाम असल्याची भूमिका पोलीस अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली यावर शासनाच्या निर्णयानुसार मंडळाच्या भावनांचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले.
बैठक संपल्यानंतर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी गंगापूर शहरातील रस्त्यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या.
दरम्यान या बैठकीला उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी विजय परदेशी, तहसीलदार वैजापूर राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी एच आर बोयनार, वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, संतोष माने, उपनगराध्यक्ष साबेर खान, शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक मंच्छिंद्र सुरवसे, गंगापूर चे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, वैजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, विरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे,देवगांव रंगारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,शिऊरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वैजापूर तालुक्यातील पोलीस पाटील आदीसह सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील पदाधिकारी व गणेश मंडळांचे अध्यक्ष व शाांतता समिती सदस्य उपस्थित होते.