मुंबई :- २३ ऑ. (दीपक परेराव) अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही,असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्काला उधाण आले आहे. 

दानवे यांच्या कामाचे कौतुक करतानाच भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे मानले जात आहे.शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज महाविकास आघाडीच्या बैठकीकरीता विधान भवनात आले होते.

त्यावेळी विधानभवनातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दानवे यांच्या खुर्चीवर बसायची विनंती केली. त्याला त्यांनी नम्रपणे नकार दिला.

 उद्धव ठाकरे म्हणाले की मला दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही!