चांदवड मध्ये यंदा पोळ्यावरही महागाईची झुल. 

बैल पोळ्याचा सण अवघ्या चार दिवसावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्याची लगभग शेतकरी करत आहे. साजांच्या विविध साहित्याला महागाईचा फटका बसला असून, तरी शेतकरी आपल्या वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाच्या साठी साज खरेदी करताना दिसत आहे. 

तसेच वर्षभर शेतात काम करून उत्पन्न देणारे बैल शेतकऱ्यांच्या दैवत असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी बैलांना शेतातील कामाला लावले जात नाही, तसेच या दिवशी त्यांच्याकडून कुठलेही काम करून घेतले जात नाही, त्यांची मिरवणूक काढली जाते, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरून त्यांचा मान राखला जातो, यंदा पोळ्या सणावर महागाईचे सावट असले तरी ऋण काढून का होईना सण साजरा करण्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या बैलपोळ्याच्या सणानिमित्त साज घेताना निमगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब जाधव, व बाळासाहेब कबाडे, तसेच बाळासाहेब होनराव यांनी अधिक माहिती दिली. 

बाईट भाऊसाहेब जाधव निमगव्हाण

बाईट बाळासाहेब कबाडे चांदवड

बाईट बाळासाहेब होनराव चांदवड