पाथर्डी (प्रतिनिधी) आज दिनांक 23/8/2022 रोजी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण सर यांनी पाथर्डी तालुक्यातील वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनांची अमंलबजावणी पारदर्शकपणे व्हवी यासाठी पाथर्डी पंचायतसमिती गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांची भेट घेतली.तोडुळी गावातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाची गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी यासंदर्भात चर्चा झाली. 

त्याचबरोबर 24/5/2022 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र खर्च करण्यात आला आहे यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी कडुन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर साहेब यांच्या दालनासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची सखोल चैकशी करण्याचे आदेश जिल्हाप्रशानाने पारित केले होते त्यानुसार पाथर्डी तालुक्यातील काही गावे सॅम्पल म्हणुन देण्यात आली होती त्यामध्ये पाडळी, माळी बाभळगांव, धामणगांव यापैकी जिल्हा विस्तार अधिकारी निमसे सर यांनी पाडळी गावाची पाहणी केली असता 4 लक्ष रुपयाचे काम इतरत्र करण्यात आले आहे असा स्पष्ट उल्लेख करून हा अहवाल समाजकल्यान अधिकारी राधाकिसन देवढे यांना सादर केला होता त्यावर 30/6/ 2022 रोजी समाजकल्याण अधिकारी देवढे सर यांनी पाथर्डी गटविकास अधिकारी पालवे यांना अहवालानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.त्यावर अद्यापही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. 

जोपर्यंत ही लोक व्यवस्थित कामे करत नाहीत तोपर्यंत यांचे बिल अदा करू नका असा सज्जड दम प्रा किसन चव्हाण सर यांनी गटविकास अधिकार्यांना दिला.आगामी काळात संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण गावांची त्रयस्तपणे चौकशी करण्याची मागणी देखिल प्रा. किसन चव्हाण सर यांनी केली यावेळी शेवगांव पाथर्डी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य कर्यकर्ते उपस्थित होते.