फुलंब्री शिवारातील रेलगाव रोडवरील नागेश्वर मंदिरावर पुजारी म्हणून काम पाहत असलेल्या
संतोष बाबुराव शेरकर वय 55 वर्षे यांचा विहिरीत पडून मृत्यु झाला आहे तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री शिवारात नागेश्वर महादेव मंदिर असून या मंदिराची पूजा अर्चा करण्याचं काम संतोष बाबुराव शेरकर ही अनेक वर्षांपासून करत होते,त्याच बरोबर मंदिरालगत गट न 865 मध्ये त्यांची जमिन आहे,सध्या शेतातील कामे चालू असल्याने दोघे जण 1:30 वाजेच्या दरम्यान आपल्या शेतीमधील गवत काढत होते,शेतातील विहिरी जवळील गवत काढत असताना संगीता शेरकर यांचा तोल जमिनी लगत असलेल्या विहिरीत गेला व त्यांना वाचवण्यासाठी त्याचे पती संतोष बाबुराव शेरकर यांनी विहिरीत उडी घेतली मात्र, यात त्यांना यश आले नाही व यातच त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला असून,जवळपास असलेल्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आलं असताना त्यांनी विहिरी जवळ जाऊन पुजारी यांच्या पत्नी संगीता शेरकर हिला विहिरी बाहेर काढले,व त्यावेळी ही सर्व माहिती पोलिसांना कळवण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,व विहिरीत जास्त प्रमाणत पाणी असल्यामुळे संतोष शेरकर हे पाण्यात दिसून आले नसल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकाला यांची सूचना दिली व रेस्क्यू टीम ने पाण्यात खोल पर्यंत जाऊन संतोष शेरकर यांचा मृतदेह बाहेर काढला महात्मा फुले क्रीडा मंडलच्या रुग्णवाहिकेतून विजय देवमाळी यांनी दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता,संतोष शेरकर यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर त्यांच्या पत्नी संगीत शेरकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं नातेवाईक बोले जात आहे मात्र या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,मृतदेह शवविच्छेदन नंतरनातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल लहाने हे करीत आहे