जैन धर्मियांचे मुनीराज आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा शिरपूर (जैन) येथे चातुर्मास सध्या सुरु आहे. या चातुर्मासादरम्यान देशातील विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी शिरपूर (जैन) येथे मोठया संख्येने येत आहे. चातुर्मासानिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्ते व परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच आवश्यक त्या सुविधा तेथे तातडीने उपलब्ध करुन दयाव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. आज 23 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महामुनीराज आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या शिरपूर (जैन) येथील वर्षायोग अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. षण्मुगराजन म्हणाले, आचार्य विद्यासागरजी महाराज राहत असलेल्या परिसरात स्वच्छता ठेवावी. गावातील संपुर्ण रस्ते व्यवस्थीत असतील तसेच रस्त्यांवर कोणीही अतिक्रमण करणार नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दयावे. शिरपूर (जैन) येथे स्वच्छता व रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा दिसून आल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. आरोग्य विभागाने आपल्या काही चमु या गावातील नागरीकांच्या तसेच भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी सज्ज ठेवाव्यात. तसेच त्यांचे विविध नमुने घेऊन त्याची देखील तपासणी करावी. गावाला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या नळ योजनेच्या विहीरीत आवश्यक तेवढे ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जतुंकीकरण करण्यात यावे. शिरपूर (जैन) या गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येत असून तो मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या आराखडयामध्ये विविध बाबींचा समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले. या आढावा बैठकीला वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, मालेगांव तहसिलदार रवि काळे, गटविकास अधिकारी के.एस. काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.सी. खारोडे, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.के. बेले, मालेगांवचे शाखा अभियंता के.एस. जोगदंड, वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. गिनमिने, शिरपूर (जैन) च्या सरपंच राजकन्या अढागळे, मालेगांवच्या सहायक अभियंता प्रियंका धायगुडे व शिरपूरचे ग्रामविकास अधिकारी बी.पी. भुरकाडे यांची उपस्थिती होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
केंद्रीय विद्यालय बूंदी के पूर्व शिक्षक श्री अमित कुमार तिवारी का प्रेरणा कार्यक्रम, शिक्षा मंत्रालय के लिए Mentor के लिए चयन I
केंद्रीय विद्यालय बूंदी के पूर्व शिक्षक श्री अमित कुमार तिवारी,कार्यानुभव शिक्षक का उनकी...
ડીસા રૂરલ પોલીસ મથકે શસ્ત્ર પૂજન કરવામાં આવ્યું
ડીસા રૂરલ પોલીસ મથકે શસ્ત્ર પૂજન કરવામાં આવ્યું
कोकणातील नद्या घेणार मोकळा श्वास
रत्नागिरी : कोकणात दरवर्षी पडत असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे शहरांमध्ये शिरत असलेलं पुराचे...
Truck Driver Protest : Hit And run मामले में Strike का दूसरा दिन | MP News | Chakka Jam | CM | N18V
Truck Driver Protest : Hit And run मामले में Strike का दूसरा दिन | MP News | Chakka Jam | CM | N18V
कोटा: पड़ौसी ने किया जानलेवा हमला, पीड़ित परिवार ने की न्याय की मांग
मामला शहर के विज्ञान नगर थाना क्षेत्र का है जहां पंकज नरेश त्रिवेदी पर पड़ौसी पवन लम्बा द्वारा...