औरंगाबाद (आप्पासाहेब गोरे) अदखलपात्र प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागून त्यातील तीन हजार रुपये स्वीकरताना फुलंब्री पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी (दि. २३) फुलंब्री रुग्णालयात ही कारवाई करण्यात आली. राहुल दशरथ लहाने (३२, रा. पवन नगर, खुलताबाद रोड, फुलंब्री) लाचखोर पोलिस नाईकचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराने फुलंब्री पोलिस ठाण्यात एका प्रकरणात तक्रार दिली होती. आढळपत्र असलेल्या या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी लहाने याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये तीन हजार रुपयांवर तडजोड झाली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. खाडे यांनी या प्रकरणातील तक्रारदाराने फुलंब्री पोलिस ठाण्यात एका प्रकरणात तक्रार दिली होती. आढळपत्र असलेल्या या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी लहाने याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये तीन हजार रुपयांवर तडजोड झाली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. खाडे यांनी कारवाईसाठी हे उपअधीक्षक मारुती पंडित यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. त्यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक संदीप राजपूत यांनी अंमलदार दिगंबर पाठक, केवल गुसिंगे, भूषण देसाई, चालक अंमलदार चांगदेव बागुल यांच्या साथीने फुलंब्री येथे मंगळवारी सापळा रचला होता.एक दाम्पत्य विहिरीत पडून त्यापैकी पतीचा मृत्यू झाल्याची घटना फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी घडली होती. या प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी राहुल लहाने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात पोहोचले होते. तेथेच त्याने तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन बोलावले. मात्र, लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी त्याने तक्रारदाराला दुसऱ्या प्रकरणाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत तब्बल तासभर रुग्णालयात बसवून ठेवले. त्यानंतर मात्र लाचेची स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.