शांतता समितीची बैठक
आज दि 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, साहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. गणपती बसवण्यासाठी सर्व गणेश मंडळाचे अधिकृत परवानगी द्यावी.
आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. काही दिवसांनी पोळा हा सण आहे.त्याचप्रमाणे गणपती उत्सव पण आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात सर्व ठिकाणी शांतता बाळगावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, गावातील सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे बैठक घेण्यात आली . पुढील काही दिवसांत सण उत्सव आहेत सर्व समाजातील लोकांनी अतिशय शांततेने साजरा करावेत कोणीही कायद्याचा भंग करू नये. पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व ठिकाणी लक्ष राहणार आहे. अनेक गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी अनेक समस्या सांगितल्या . पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.