कर्जतचे तहसीलदार आगळेची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड, तर त्र्यंबके उत्कृष्ट कर्मचारी 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

औरंगाबाद प्रतिनिधी/- महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांची तहसीलदार संवर्गात, तर अव्वल कारकून संवर्गात कर्जतच्या किशोरी त्र्यंबके यांची अनुक्रमे उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून निवड झाली. एक ऑगस्ट रोजी महसूल दिनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

          १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै दरम्यान महसूल विभागाच्या कामकाजात जिल्ह्यात कर्जतचे काम उजवे ठरले असून त्या अनुषंगाने या वर्ष भरातील कामाच्या आधारे महसूल विभागाने या कामाची दखल घेत कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे तर कर्जत तहसील कार्यालयातीलच अव्वल कारकून श्रीमती त्र्यंबके यांना जिल्ह्यात उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात येणार आहे. 

यापूर्वी देखील आगळे यांना नाशिक विभागाकडून “एम्पलॉयी ऑफ द मंथ " पुरस्कार कर्जतच्या तहसीलदारम्हणून कार्यरत असतानाच्या कार्यकाळामध्येच प्राप्त झाला होता. आगळे यांच्या पाठोपाठ कर्जत तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकून किशोरी त्र्यंबके यांना देखील अव्वल कारकून संवर्गात“उत्कृष्ट कर्मचारी” म्हणून बहुमान मिळाला आहे.

           तहसीलदार आगळे आणि अव्वल कारकून त्र्यंबके यांना सोमवार, दि १ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हा सन्मान दिला जाणार आहे. दोन्ही पुरस्कार विजेत्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले, शिरस्तेदार पाडळे यांच्यासह कर्जत महसूल उपविभाग आणि तहसील कार्यालयासह अनेकांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

     चौकट गेली वर्ष भर काम करताना.प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, कर्जत तालुक्यातील महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी, माझे कुटुंबीय या सर्वांचा या यशात महत्त्वाचा वाटा आहे. हे यश मिळाले याचा आनंद तर आहेच. मात्र, वाढलेल्या जबाबदारीची ही जाणीव आहे. भविष्यात सर्वांच्या सहकार्यातून सर्वोत्तम कामगिरी बजावीन. 

- नानासाहेब आगळे, तहसीलदार, कर्जत.