अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतोनात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले म्हणून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी बस स्थानक ते तहसील १ कि मी पर्यन्त कार्यालयावर लोटांगण घेत शेकडो शेतकऱ्यांसह धडक दिली. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

  अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नांदगाव तालुक्यात झाला असून शेतकऱ्यांची पिके खरडून गेली तर अनेक गावांत पाणी घुसले तीन नागरिकांची जीवितहानी सुद्धा झाली सोयाबीन कापशी व तूर या पिकाचे अतोनात नुकसान झाले शेतामध्ये पाणी थांबून शेतात तळे निर्माण झाले होते असतांना नांदगाव तालुक्यात अतिवृष्टी होऊनही प्रशासनाने नोंद न घेता तालुका अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांन मध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर केलेल्या यादीत नांदगाव तालुक्याचा समावेश नाही म्हणून युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता बस स्थानक परिसर ते तहसील कार्यालय पर्यन्त शेतकऱ्यांन सह लोटांगण आंदोलन केले यावेळी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. 

संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,नियमित पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले असून ते तात्काळ देण्यात यावे,अनेक गावात पाणी घुसून घरांची पडझड झाली असून सदर घरे घरकुल योजनते प्राधान्याने मंजूर करावे,महसूल व कृषी विभागाने अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पीक विमा कंपनी ग्राह्य धारून पिक विमा मंजूर करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार यांनि आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले,आंदोलना दरम्यान अंगावर शहारे आणणारा प्रसंग निर्माण झाला असून यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली होती.