गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सर्वागीण शैक्षणिक विकासासाठी शासनाने अनेक अभ्यासक्रम ांना शिष्यवृत्ती लागु केली आहे . मात्र महाराष्ट्र राज्य तंत्र मंडळाव्दारे शिक्षण संचालीत नॉन ांना एआयसीटी अभ्यासक्रम शासकीय शिष्यवृत्ती लागु नसल्यामुळे अनेक होतकरु व गरजु विद्यार्थी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यापासून वंचित राहत आहेत . ही बाब लक्षात घेवून शासनाने एमएसबीटीई व्दारा संचालीत अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती लागु करावी अशी म गणी आर्यव्रत पॅरामेडीकल व्यावसायीक शिक्षण स्वयंरोजगार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ . माधव हिवाळे यांनी केली आहे . यासंदर्भातील एक निवेदन सोमवार , २२ ऑगष्ट रोजी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शिक्षणमंत्री , उच्च व तंत्र शिक्षणमंत्री , शिक्षणसचिव , उपसचिव , सामाजीक न्याय राज्यमंत्री , प्रधान सचिव यांच्यासह महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संबंधीत अधिकार्यांना पाठविण्यात आले . निवेदनात नमूद आहे की , पॅरामेडीकल क्षेत्रात बर्याच गरीब व गरजु विद्यार्थ्यांची करिअर करण्याची इच्छा असते . परंतु भरमसाठ फी मुळे या कोर्से सला प्रवेश घेणे गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही . त्यामुळे ते या महत्वपुर्ण शिक्षणापासून वंचित राहतात . या कोर्सेसला जर शिष्यवृत्ती मिळाल्यास विद्यार्थी संख्येत वाढ होईल व देशातील बेरोजगारांची संख्या कमी होण्यास मदत होईल . ही बाब पाहता या कोर्सेसला शासनाची शिष्यवृत्ती सुरु होणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी आपण आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी . जेणेकरुन तळागाळातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांचा या कोर्सेसचा लाभ होईल व या क्षेत्रात ते आपले करीअर घडवू शकतील . तरी या बाबीवर गंभीरतेने विचार करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई व्दारा संचालीत नॉन एआयसीटी कोर्सेसला शिष्यवृत्ती लागु करुन गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाची वाट मोकळी करुन द्यावी अशी मागणी डॉ . हिवाळे यांनी केली आहे .