यवतमाळ : आशा व गटप्रवर्तकांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही त्या सोडविल्या जात नाही. आशा वर्करचे पाच महिन्यापासून मानधन थकीत असल्याने संताप व्यक्त करीत आयटकच्या नेतृत्वात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आशा कर्मचार्‍यांकडून काम करून घेतले जाते. परंतु, त्यांच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही. अधिकारी,कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर केले जाते. आशा वर्करला तोकडे मानधन आहे. तेदेखील वेळेवर मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. वेळेत मानधन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.