फुलंब्री तालुक्यात गणपती स्थापनेसाठी सर्वांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा,यासाठी फुलंब्री पोलीस स्टेशन येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटाने संपूर्ण देशात थेमन घातले होते,यामुळे कधी नव्हे ती लॉक डाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली होती,यामुळे अनेकांच्या हातची कामे गेली,नोकऱ्या गेल्या,व्यवसाय बंद झाले,हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला,तर अनेक लहान मुलांवर अनाथ होण्याची वेळ देखील यामध्ये आली.यासर्व गोष्टी घडत असताना कोरोना आटोक्यात यावा म्हणून शासनाने अनेक निरबंध लावले,त्यामुळे सण,वार,उत्सव सगळं काही बंद झालं होतं,सलग दोन वर्षे निरबंधात निघून गेल, आणि 2020 मध्ये आलेला कोरोना विषाणू मुळे 2021 पर्यंत लॉक डाउनची परिस्थिती होती, 2022 कोरोनाची परिस्तिथिती पूर्वपदावर आली आणि आता पुन्हा सण उत्सव जोमात सुरू झाले,आता गणेशोत्सव येणार असून या काळात सर्व गणेश मंडळांनी आपली ऑनलाईन नोंदणी करावी तसेच कुठल्याही समाजला गालबोट लागणार नाही अशी कामे करू नये असे आव्हाहन फुलंब्री पोलिसांच्या वतीने करण्यात आले असून आज रोजी झालेल्या गणेशोत्सव शांतता बेठकीसाठी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे,सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बन्सोड, नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ,भाजपा शहराध्यक्ष यौगेश मिसाळ,ओबीसी तालुकाध्यक्ष राम बनसोड,नगरसेवक जफर चिंशती यांच्या सह तालुक्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष,सरपंच पोलीस पाटील यांची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती.