ग्रामीण रुग्णालयातील प्रकार आला उघडकीस

पालम प्रतिनिधी 

पालम ग्रामीण रुग्णालय हे खरोखरच शोभेची वास्तू बनलेले असल्याचा प्रत्येक राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाला प्रत्यक्ष आला. पालम राष्ट्रवादी च्या शिष्टमंडळाने अचानकपणे ग्रामीण रुग्णालय पालम ला भेट दिली असता अनेक कर्मचारी डॉक्टर व स्वतः रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ, द्रोणाचार्य गैरहजर असल्याचे दिसून आले पालम राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वसंत काका शिरसकर राष्ट्रवादीचे नेते जिया पठाण ,नगरसेवक गौतम हत्तीआंबिरे ,प्रतिष्ठित नागरिक दत्तराव घोरपडे, शेख मगदूम कुरेशी, फारूक आधी शिष्टमंडळाने भेट दिली असता वरील प्रकार दिसून आला वसंत काका शिरस्कर यांनी डॉक्टर द्रोणाचार्य यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाहीअसे शिष्टमंडळाकडुन सांगण्यात आले. डॉक्टर द्रोणाचार्य यांच्या सेवा कर्तव्याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित होऊनही वरिष्ठांचे त्यांच्याकडे का दुर्लक्ष होत आहे त्यांना का अभय वरिष्ठांकडून मिळत आहे असे प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागले आहेत. आज पर्यंत फक्त रुग्णांना त्यांचा अनुभव आला होता परंतु आज प्रत्यक्ष राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने भेट दिली असता ते गैरहजर असल्याचे आणि त्यांचे बेजबाबदारपणाचे व कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्याचे प्रचिती आली. तालुक्यातून आलेले रुग्ण रांगेत घंटो उभा टाकलेले दिसून आले रुग्णांची होणारी हेळसांड पाहून तालुकाध्यक्ष वसंत काका शिरस्कर यांनी भ्रमणध्वनी वरून कदम साहेब यांच्याशी संपर्क साधून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर जिल्हा शल्य चिकित्सक काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे ठरेल.

चौकट : पालम चे ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण भागातून येणाऱ्या व शहरातील रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाचे हे आहे. परंतु या रुग्णालयासाठी एकूण डॉक्टर व कर्मचारी मिळून 23 पदाला मान्यता आहे. परंतु काही जागा भरल्या नसल्यामुळे रिक्त असल्यामुळे असंख्य अडचणींना रुग्णांना तोंड द्यावे लागत आहे त्यांना वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाहीत त्याकरिता आम्ही पालम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे ज्या काही रिक्त जागा असतील त्या त्वरित भरण्यात याव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत. आजचा झालेला प्रकार हा अतिशय नंदनीय आहे कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांनी एवढ्या बेजबाबदारपणे रुग्णांची गैरसोय होईल असे वागू नये. कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमुळे एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण याचा वरिष्ठांनी विचार करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वसंतराव शिरसकर