यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसूती झाल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे. शुभांगी सुदर्शन हापसे (रा. टाकळी), असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी अधिकारी  उपस्थित नसल्याने प्रसूतीत बाळ दगावले  होते. या प्रकरणी चौकशी समिती नेमून अहवाल देण्यात आला. या प्रकरणी 

2 कंत्राटी डॉक्टरांना सेवामुक्त करण्यात आले.कंत्राटी आरोग्य सेविकेला सेवेतून मुक्त करण्यात आले. तर 4 जणांना निलंबित करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ मुनेश्वर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून कोण कर्मचारी उपस्थित होते. कोण दौऱ्यावर होते, सर्वच रेकॉर्ड ताब्यात घेतले होते.