सणसवाडी येथे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे पुत्र, युवा नेते ऋषीराज पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या हस्ते  वृक्षारोपण करून श्रावणी सोमवार निमित्ताने शिवभक्तांना  खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित्यांच्या वतीने ऋषिराज पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  पंडित आप्पा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ हरगुडे, चेअरमन सुहास दरेकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन गोरख दरेकर, नवनाथ दरेकर माजी सदस्य रामभाऊ दरेकर, सुभाष दरेकर, माजी सदस्य अनिल दरेकर, प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर, बबन दरेकर, बापू दरेकर, शाम दरेकर, निलेश दरेकर, अनिल गोटे, प्रकाश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.