अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रक्ततुलाचा आणि दहीहंडीचा एकत्रित कार्यक्रम अमरावती शहरातील नवाथे चौक येथे आयोजित केला होता.अतिशय भव्य असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिनेअभिनेता गोविंदा यानेदेखील हजेरी लावली होती.

 तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढच्या निवडणुकीत भाजपचाच आमदार-खासदार निवडून येईल, अशी घोषणी केली. तर फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आणि राणा दाम्पत्याच्या कामांचं कौतुक केलं. त्यानंतर अभिनेता गोविंदाने दोन मिनिटाचं भाषण करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. यावेळी गोविदाने डान्सदेखील केला आहे