सिलिंडर घरपोच करण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जाते.
"पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील त्रिकुटा गॅस एजन्सीचा मनमानी कारभार"
पाचोड(विजय चिडे)केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात नव्याने ५० रुपयांची वाढ केल्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. याचा ग्राहकांना मोठा भुर्दंड बसत असताना दावरवाडी ता.पैठण येथील इण्डेन गॅस एजन्सी कंपनीने गावामध्ये त्रिकुटा गॅस एजन्सीला, एजन्सी चे ऑफिस दावरवाडी गावात बाजार तळा जवळ असून मागील दोन वर्षांपासून त्रिकुटा गॅस एजन्सी परीसरात इण्डेन गॅस पुरवत आहे. मात्र या गँस एजन्सीकडून घरपोच सुविधा देण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावा लागत असल्याने ग्राहक अतिशय त्रस्त आहेत.
त्रिकुटा गॅस एजन्सीचे दावरवाडीमध्ये वितरक आहेत. सिलिंडर घरपोच करण्यासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम आकारली जाते. त्याची पावती दिली जात नाही. सिलिंडर वजन करून दिले जात नाही. रकमेबाबत छपाई न करता हस्तलिखित पावती दिली जाते. अनुचित घटना घडल्यास अग्निशामक यंत्रणा, उपाययोजना कार्यान्वित नाही. सर्वसामान्य ग्राहकांना सुविधा दिल्या जातात त्याची माहिती दिली जात नाही.या एजंन्सी अंतर्गत दावरवाडी व नांदर,कौदर,डेरा सह परिसरातीत गावात पुरवठा करण्यात येतो.
त्रिकुटा गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना प्रतिसिंलेंडर मागे ५० ते ६० रुपयांचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. याची विचारना केली असता आम्हाला एजन्सी डीलर्स कडून वसूल करण्याचे सांगिलते आहे, असे सांगितले जाते. डीलर कडून ग्राहकांना ५०/६० रुपये ग्राहकां कडुन सिलेंडर व्यतिरिक्त आकारले जातात.ग्रामीण भागातील काही निरक्षर ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात.परंतु हा प्रकार प्रत्येक ग्राहकांना सोसावा लागत आहे. कुठलाही शुल्क आकारण्याचे अधिकार नसतांना हि त्रिकुटा गॅस एजन्सी ग्राहकांन कडुन अतिरिक्त शुल्क आकारुन मनमानी कारभार करत आहे. हा शुल्क कशासाठी घेण्यात आला व आता पर्यंत किती रुपयांचा अतिरिक्त शुल्क ग्राहकांन कडुन आकारण्यात आला.याची संबंधित विभागाने चौकशी करून या गॅस एजन्सी वर कारवाई करावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्राहक करत आहेत. यापुढे असा शुल्क ग्राहकांना कडुन आकारला तर संबंधित विभागापुढे तिव्र एजन्सीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
गावातील त्रिकुटा एजन्सीचे कार्यालय माझ्या घरानजदीकच आहे. तरी प्रत्येकवेळी माझ्याकडूनसिलिंडर घरपोच करण्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारली मागीतले जाते दावरवाडील त्रिकुटा गॅस एजन्सीचा नुसता मनमानी कारभार सुरू आहे.तरी संबंधित विभागाने चौकशी करून या गॅस एजन्सी वर कारवाई करावी.
जालिंदर जोगदंड,ग्राहक,दावरवाडी.
चौकट:-आमच्या गॅस एजन्सी मार्फत कुठलेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. काही ग्राहकांच्या तक्रारीं असतील तर त्या ग्राहकाची नावे सांगा त्यांच्या तक्रारी सोडवल्या जातील असे गँस एजन्सीचे मालक दुबे यांनी सांगितले.