गेवराई तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांची केवळ बँक खाते ला के.वाय.सी नसल्यामुळे शिष्यवृत्ती जमा होत नाही .त्यामुळे अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहेत तरी त्यांना तात्काळ शिष्यवृत्ती बँक खातेत जमा करावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी शहराध्यक्ष शेख मोहसिन यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे इशारा दिला आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू झाले असून मात्र विद्यार्थ्यांचे हक्काचे असणारी शिष्यवृत्ती के. वाय.सी मुळे व बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे व हम करे सो कायद्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहे. तरी बँकेने या विद्यार्थ्यांची तात्काळ के.वाय.सी जोडून त्यांच्या खात्यावर तात्काळ शिष्यवृत्ती जमा करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही . अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक न करता त्यांना सहकार्य करून त्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करावी नसता अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांना चाबका खाली फोडून काढू असा सज्जड दमच यावेळी शेख मोहसीन यांनी दिला.
तसेच या विद्यार्थ्यांचे तात्काळ शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी स्वतंत्र काउंटरची देखील व्यवस्था करावी. अशी मागणी शेख मोहसीन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.