यवतमाळ दि. 22 :  पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असून ज्यांनी शेतकऱ्यांनी अद्यापही ई-के.वाय.सी. केली नसेल त्यांनी ई-के.वाय.सी. पूर्ण करावी तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांन देखील ई-के.वाय.सी. करायला सांगावें, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे पी.एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केलंय. तरी सर्व शेतकऱ्यांनी  पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी लगेच ई-के.वाय.सी. पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.