औरंगाबाद:- दि.२१ ऑ.(दीपक परेराव) औरंगाबाद पैठण तालुक्यातील शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांचे समर्थक हर्षी दावरवाडी गटातील पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी आज औरंगाबादत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये मंत्री संदीपान भुमरे गटातुन भारत वाघ,प्रभाकर न्ननवरे, किशोर वाघ, सोमनाथ गाडेकर ग्रामपंचायत सदस्य,धुपखेडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यातुन नासर चाऊस,किशोर घायाळ,निलेश घायाळ,रंजीत घायाळ,अर्जुन घायाळ दादरवाडी सर्कल पैठण यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे,युवा सेना जिल्हाधिकारी शुभम पिवळ,माजी सरपंच बिडकीन अशोक धोत्रे, ग्रामपंचायत सदस्य अशोक वंजारे, शहर प्रमुख बिडकीन किरण गुजर, युवा सेना तालुका अधिकारी विकास गोर्डे ,शाखाप्रमुख कृष्णपूर, अंकुश काळे, नादर ग्रामपंचायतीचे आकाश कावरे,बिडकीन सोसायटी संचालक अमोल कोथिंबिरे तसेच संदीप गजभाई,अजय हाडे, पांडुरंग आगाज,सोनू देशमाने आधी शिवसैनिक उपस्थित होते