औरंगाबाद:- (दीपक परेराव )वैचारिक लेवलच्या कवितेतून तिरंग्या विषयीचे प्रेम, भारतीय सैनिका विषयी आपुलकी, देशाभिमान आपल्या कवितेतून व्यक्त होणारे कवी, निसर्गाच्या विविधरूपांना शब्दांचे कोंदण देऊन कवितेच्या माध्यमातून उभे केलेले सैनिकाचे चित्र, अशोक चक्र विषयी व तिरंग्या विषयी देश प्रेमाच्या कविता आणि लोकसंगीतातील पोवाडा, लावणी, भारूडाचा अस्सल ठसका अनुभवण्याची संधी औरंगाबादकरांना मिळाली.

निमित्त होते, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जीवनगौरव पहिले कवी संमेलन, शासनमान्य एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष कवी रज्जाक शेख यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात म्हणाले कविता ही उपजत असली पाहिजे कविता बेंबीच्या देठापासून ते कंठापर्यंत उमलत यावी.तर या कार्यक्रमाचे उद्घाटक जे.के. जाधव पुढे म्हणाले की प्रत्येक कवीने लिहिते व्हावें, बोलते व्हावे. या संमेलनाला विशेष अतिथी म्हणून दैनिक सकाळचे निवासी संपादक दयानंद माने आपल्या मनोगतात म्हणाले मी कवी नाही परंतु मी चांगला श्रोता आहे. मला कविता ऐकायला खूप आवडतात आणि मी मुद्दामून कविता ऐकण्यासाठी आलेलो आहे. डॉ. राजाभाऊ टेकाळे, डॉ. प्रवीण चाबुकस्वार, आधुनिक केसरीचे संजय व्यापारी, जीवन गौरवचे रामदास वाघमारे, देविदास बुधवंत यांची मंचावरती उपस्थिती होती. विविध कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली. देशभक्तीपर भरलेली ही मैफल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली. या वेळी प्रमुख कार्यवाह संदीप ढाकणे, मीरा वाघमारे, कल्पना फुसे, प्रा. लता बावणे, बाळासाहेब निकाळजे, शुभांगी पांगारकर, जीवन गौरव परिवारातील प्रमुख उपस्थित होते.

संमेलनात अलकनंदा घुगे/आंधळे,डॉ.मधुकर दिवेकर,गोंविद पाठक,ज्योती सोनवणे,जिंतेद्र शिंदे,गजेंद्र ढवळापुरीकर,भीमराव सोनवणे,उमा तेलुरे,शाहीर उत्तमराव म्हस्के,शुंभागी पागंरकर,बाळासाहेब निकाळजे,प्रा.लता बावणे,प्रा.केशरचंद राठोड,समाधान इच्चे,प्रा कल्पना अंबुलकर या कवी कवयित्रींनी देशभक्तीपर आणि विविध विषयांवरच्या कविता, भावगीत, गझल लावणी, पोवाडा, मुक्तछंद अशा विविध प्रकारच्या कविता सादर केल्या. कवी संदीप ढाकणे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.लता बावणे यांनी आभार मानले.