निमगाव (ता.खेड) येथे चासकमान धरणाचा डावा कालवा रविवारी दुपारी आज एकच्या सुमारास फुटला. येथील सायंबाच्या ओढ्यावरील कालव्याची मोरी जागच्याजागी खचल्याने कालव्याला मोठे भगदाड पडले असून अस्तरीकरण केलेला कालव्याचा भरीव पूर्णपणे वाहून गेला आहे.यात ओढ्याकडेच्या शेतीचे अंशतः नुकसान झाले. तसेच कालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कालवा फुटल्याची माहिती कळताच धरणावरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ काळव्याचा विसर्ग बंद केला. यावेळी डाव्या कालव्यामार्गे शिरूर तालुक्यासाठी साडे तीनशे क्यूसेकने विसर्ग सुरू होता. निमगाव येथे सायंबाच्या ओढ्यावरून कालवा वाहण्यासाठी ओढ्यावर सिमेंटचा पूल तयार करण्यात आला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या ३८ व्या किलोमीटरवरील सिमेंटचे बांधकाम असलेला हा ओढ्यावरील मोरी पूल जागच्याजागी खचला. याचबरोबर ३८ व्या किलोमीटरवर कालव्याच्या उजव्या बाजूच्या मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. याठिकाणी कालव्याचे दहा ते बारा वर्षांपूर्वी अस्तरीकरण झाले होते. अस्तरीकरणासह मातीचा भराव वाहून गेल्याने ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. यात ओढ्याकडेच्या शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दावडी-राजगुरुनगर मार्गावरील वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प