औरंगाबाद:- दि.२१ (दीपक परेराव) औरंगाबाद श्री गणेश महासंघ उत्सव समितीची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या वर्षीचे २०२२-२३ यावर्षीच्या अध्यक्षपदी विजय औताडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी निवडण्यात आली या शहरातील जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेते व मान्यवरांचा समावेश आहे. दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन महासंघ गणेश उत्सव उत्साहात साजरा करणार असल्याचे पत्रकार परिषदेत गणेश महासंघाचे अध्यक्ष विजय औताडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार,अध्यक्ष विजय औताडे, अभिजित देशमुख, हर्षवर्धन कराड, नंदकुमार घोडीले,तनसुख झांबड,राजेंद्र दानवे, मनोज पाटील,संदीप शेळके, कचरू घोडके, विजय वाघचौरे,जगन्नाथ काळे,बाळासाहेब गायकवाड, राजू राठोड, राजेंद्र दाते पाटील,अनिल मानकापे, विशाल दाभाडे, डी एन पाटील आदींची तसेच प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती.

गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यावर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देवा श्रीगणेशा नृत्य व गीत गायन स्पर्धा   

गणेशोत्सवात सांस्कृतिक कलेला एक पारंपरिक महत्व आहे. पूर्वी गणेश मेळावा भरत असे. यामध्ये लोककला, बतावणी, नाटक, भारूड, जागरण, गोंधळ, शाहिरी यासह अनेक कला सादर व्हायच्या. या मराठमोळ्या कला जोपासल्या जाव्यात यासाठी जिल्हा श्री गणेश महासंघ महोत्सव समितीच्या सहकार्याने युवामित्र फाऊंडेशन च्या वतीने अंतर शालेय व महाविद्यालयीन गटात नृत्य गीत गायन स्पर्धेचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ही स्पर्धा घेण्याचे नियोजन असून स्पर्धकांनी संयोजक सचिन अंभोरे यांच्याशी किवा 9970409640 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.   

*स्थापना

महालक्ष्मी देखावा स्पर्धा (ऑनलाईन)

• वृक्षारोपण कार्यक्रम

• ह.भ.प. डोक महाराज यांचे जाहीर किर्तनाचा कार्यक्रम

• कुस्ती स्पर्धा

• भव्य ढोल वादन स्पर्धा

• शहरातील योगसाधकांचा सत्कार

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निदान शिबीर

• सांस्कृतीक कार्यक्रमांतर्गत नृत्य स्पर्धा

• ई-अमकार्ड विविध शासकिय उपक्रमांचे कार्ड चाट

• रक्तदान शिबीर

• महिलांसाठी विशेष करून मोफत देव दर्शन सोहळ्यात देव-शिर्डी शनिशिंगणापूर या देवस्थानाचे दर्शन

नोंदणीसाठी संपर्क क्रमांक: २७६४६३०००० यावर संपर्क करावा) याप्रमाणे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमाच्या साठी सामाजिक, राजकिय क्षेत्रातील विविध मान्यवर आणि सन्माननिय मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.