फुलंब्री शहरातील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या वेद्यकीय अधिकारी डॉ शेख तस्लिमा 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

या रुग्णासोबत गैर वर्तन करीत आहे.अश्या आशयाचे निवेदन ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले.

यामध्ये डॉक्टर आपला मनमानी कारभार करत,ओपीडी साठी वेळेवर हजर राहत नसल्याने,रुग्ण ताटकळत राहत असून रुग्णाची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आणून दिले त्याच प्रमाणे मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा त्याला केराची टोपली दाखवण्याच काम डॉक्टर करीत असल्याच याठिकाणी दिसून येत आहे.काल ain news ने या सर्व प्रकार अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिला होता. मात्र मुजोर अधिकारी यांना वरिष्ठ अधिकाऱ्याचा वचक नसल्याने दिसून येत आहे.आज दि 23 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान फुलंब्री येथील रहिवासी हरून चांद हा आपल्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन आला होता.त्यावेळी डॉ तस्लिमा शेख या वैद्यकीय कक्षात बसून रुगांची तपासणी करत होत्या,शेख हरून याचा नंबर आला आणि तो आपल्या आईला घेऊन डॉ यांच्या केबिनमध्ये गेला.यावेळी डॉ तस्लिमा यांनी तपासणी न करता ,काय झालं एवढं विचारले व चिठी वरती औषधी लिहून दिली.यावर आईच्या सोबत असलेल्या हरून याने डॉक्टरांना सांगितले की माझ्या आईला शुगर चा त्रास आहे व आपण त्यांना व्यवस्थित तपासून उपचार करावा यासाठी विनंती केली.

मात्र डॉ यांनी त्यांना समजावून न सांगता आम्हला कळत नाही का तुम्हांला जास्त समझत का एवढं समझत तर तुम्हीच उपचार करा असे उद्धट पणे उत्तर दिले,यावर अश्या प्रकार डॉ यांनी उत्तर देणे अपेक्षित नव्हते.यानुसंघाणे डॉ तस्लिमा यांच्या विरोधात रुग्णासोबत गैरवर्तन केल्या बद्दल ग्रामीण रुग्णालयात तक्रार दिली असून कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर शेख हरून,सय्यद अकबर सुभान,फिरोज खालेद शहा,राईस शेख जाहीर ,फरहान मन्सूर शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.आता वरिष्ठ अधिकारी डॉक्टरच्या या कारभारावर कारवाई करतील की त्यांना पाठीशी घालतील ही येणारी वेळच सांगेल