सिल्लोड व फुलंब्री या तालुक्याला जोडणारा गिरजा नदीवरील पूल खचला असून पुलालाला मोठमोठे भगदाडे पडल्याने पुलाचे पाणी नळ कंडयातुन न जाता भंगदडयातुन जात असल्याने भगदाडे पाण्याने मोठे झाल्यामुळे हा पुल पुर्ण पोकळ झाल्याने पुलावरुन दि . २० शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान लोडीग भरलेला ट्रक जात असतांना पुल खचला परंतु दुरदैवाने ट्रक सुखरूप बाहेर निघाला त्यामुळे दुरघटना टळली,मात्र आता उरलेला पुल सुद्धा पडण्याची शक्यता असून अखेरची घटका मोजत आहे . या पुलाची दुर्दशा अनेक वेळा प्रसिद्धी माध्यमातून मांडण्यात काळी मात्र झोपेचे सोग घेणारे अधिकारी यांना त्याच तिळमात्र फरक पडला नाही. याकडे संबधीत विभागाने व लोक प्रतिनिधीनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसुन येत आहे . हा पुल सिल्लोड ते औरंगाबाद शेंद्राएमआय डीसी या रस्त्यावर येतो . आणि या रस्त्याने आनेक लोडीग गाड्याची रहदारी असते . त्यामुळे या पुलांची उंची वाढुन नवीन काम झाले पाहीजे अशी मागणी नागरी करीत आहे . परंतु या पुलांची वारंवार थातुरमातुर डागडुजी करून मलम पटी केली जाते, विशेष म्हणजे हा पुल तीन मातबदार नेत्याच्या मतदारसंघातला
असून याची अशी दुर्देवी अवस्था असल्याने,नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.आता भर पावसाळयात हा पूल शेवटच्या घटका मोजत असून एखाद्या पुराच्या पाण्यात तो वाहून ही जाईल यावेळी दळणवळणाची मोठी अडचण निर्माण होणार असून संबंधित लोकप्रतिनिधीव संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे