मालेगांव शहरातील उर्दू शाळेच्या मागे राहणारा 35 वर्षीय विवाहित तरुण 17 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची फिर्याद तरुणाच्या पत्नीने मालेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर मालेगांव पोलिस ठाण्यात प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
या प्रकरणी मेहबुबा बी साबीर खान वय 30, रा. उर्दू शाळेच्या मागे, मालेगांव जिल्हा वाशिम यांनी आज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी मुलांवर ओरडण्याचा कारणावरून पत्नी सोबत वाद झाल्यानंतर साबीर खान अजगर खान वय 35 वर्षे हा पत्नीच्या नावाने फिर्याद देण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये जातो म्हणून 17 ऑगस्ट च्या सकाळी 9 वाजता घरून निघाला परंतु त्यानंतर परत आला नाही. त्याची पत्नी मेहबूबा बी ने आजुबाजुला व सर्व नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर ही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे निराश होऊन मेहबूबा बी ने मालेगांव पोलिस स्टेशन गाठून आपल्या पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली, तक्रारीवरून मालेगांव पोलिसांनी प्रकरण दाखल केले असून पुढील तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब पोलिस कांस्टेबल प्रेमदास आडे करीत आहेत.