शिरुर तालुक्यात पकडला डमी आमदार
शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील घटना
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरूर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली असून विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना ज्या भाजपच्या आमदाराने स्टिकर पुरविले होते त्यानेच सदर गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावलेल्या चारचाकी गाड्या नेहमी गिरक्या घालत असून शिक्रापूर पोलीस स्टेशन परिसरात पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी संशयास्पद गाड्यांची चौकशी आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असताना रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर असलेली एक गडद काळ्या काचांची तसेच नंबर नसलेली स्विफ्ट गाडी फिरत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना समजले त्यांनतर पोलीस हवालदार अमोल दांडगे यांनी सदर कार ताब्यात घेतली, सदर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांची चांगलीच धावपळ झाली. तर याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले की असला गंभीर प्रकार सहन केला जाणार नसून संबंधितांवर कारवाई केली जाणार असून ज्या आमदाराने या गाडीसाठी स्टिकर पुरविले त्याची देखील चौकशी केली आहे. तर पोलिस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.