डोक्यावर हात ठेवून आजार बरे करतो म्हणून गंडविणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश

पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातील पारुंडी गावात गेल्या दोन वर्षांपासून बाबासाहेब शिंदे नावाचा व्यक्ती सर्रासपणे आरोग्य सभा भरवत होता. तो स्वतःला पाद्री बाबा म्हणतो. दर शुक्रवारी गावात त्याची आरोग्य सभा भरते. या सभेत मराठवाड्यातून हजारो रुग्ण येतात. कॅन्सर, बीपी, शुगरसह असाध्य रोग या बाबाने फक्त डोक्यावर हात ठेवला की, बरे होतात, असा दावा तो करायचा. अखेर त्याचा भांडाफोड करण्यात आला आहे.

हा भोंदूबाबा गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादेत आरोग्य सभा भरवत आतापर्यंत त्याने अनेकांना गंडवले आहे. त्याच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य चिटणीस शहाजी भोसले यांनी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी डोक्यावर हात ठेवला की, कॅन्सर, बीपी शुगर, असे अनेक दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका भोंदूबाबाचा भांडाफोड केला आहे. जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या पारुंडी गावात गेल्या दोन वर्षांपासून बाबासाहेब शिंदे हा आरोग्य सभा भरवतो. तो सवतःला पाद्री बाबा म्हणतो. दर शुक्रवारी गावात आरोग्य सभा भरली जाते. या

सभेत मराठवाड्यातून हजारो रुग्ण येतात. कॅन्सर, बीपी, शुगरसह असाध्य रोग या बाबाने फक्त डोक्यावर हात ठेवला की बरे होतात, असे दावे करण्यात येतात. यामुळे अनेक जिल्ह्यातून रुग्ण बाबाकडे येत असतात. मात्र, अखेर या बाबाचा आता भांडाफोड झाला आहे. या बाबाचे हे कृत्य आज समोरपुढे आलं आहे. याप्रकरणी आता अंनिसकडून पुरावे गोळा केले जात आहेत. नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या या बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे.

उच्चशिक्षित बाबाचा रुग्ण बरे करण्याचा दावा.

उच्चशिक्षित असलेला बाबासाहेब शिंदे स्वतःला एका धर्माचा गुरू आहे, असे सांगतो. सोबतच येशूंच्या आशीर्वादानेच आरोग्य सेवा देत असल्याचा दावा करतो. अंगात इस्तरीचे कपडे, शर्ट इन करून येणारा हा बाबा लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. ज्या रुग्णांवर डॉक्टरही उपचार करू शकले नाहीत, त्यांच्यावर आपण उपचार करून त्यांना बरे केल्याचा दावा हा डॉक्टर करतो आहे. एवढेच नाही तर शुगर, कॅन्सरसारख्या आजारांवर सुद्धा आपण उपचार केल्याचा दावा हा बाबा करतो आहे.

स्थानिक पुढारी सहभाग ?

या बाबाचा दरबार भरतो ती जागा गावातील एका पुढाऱ्याची आहे. या पुढाऱ्याचा एक नातेवाईक पोलीस खात्यात आहे. विशेष म्हणजे तो स्वतः याठिकाणी दरबारात माईकवरून मार्गदर्शन करतो. तर अनेक पोलीस अधिकारी सुद्धा उपचार घेण्यासाठी येथे येत असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून एवढे सर्व असताना प्रशासनाला याची साधी भनक देखील लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चौकट-गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी.

 गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य सभा भरून कॅन्सरसारखा असाध्य आजार डोक्यावर हात ठेवून बरा करण्याचा दावा करणाऱ्या या पाद्री बाबा बाबासाहेब शिंदे विरोधात पोलिसांनी जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहाजी भोसले यांनी केली आहे.