उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेचा मालेगाव तालुका आजी माजी पदाधिकारी मेळावा आढावा बैठक जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ मापारी यांच्या अध्यक्षतेखाली तर शिवसेनेचे विश्वनाथ सानप , युवा सेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, वाशिम ता.प्र.रामदास मते, संभाजी ब्रिगेडचे सुभाष बोरकर, वाशिम पंचायत समिती सदस्य बालाजी पाटील, वाशिम शहर प्रमुख गजू भांदुर्गे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रांजली पाध्ये, रामकृष्ण वानखेडे माऊली, भगवान वाकुडकर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

             छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.या प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष सुरेश मापारी व प्रमुख अतिथी मान्यवरांचा पुष्पहार तथा पुष्पगुच्छाने सत्कार मालेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. प्रमुखअतिथी विश्वनाथ सानप, रवी भांदुर्गे, बालाजी वानखेडे, रामदास मते पाटील, सुभाषराव बोरकर व सोनू सांगळे, गजानन बोरचाटे, तालुकाप्रमुख उद्धवराव गोडे यांनी शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहून शिवसेना तळागाळातून वाढवावी, व ८० टक्के राजकारण 20 टक्के समाजकारण हा बाळासाहेबांचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केले आहे.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी सर्व शिवसैनिकांना शिवसेने च्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन एकनिष्ठ पणे तण-मन धनाने कार्य करून माननीय हिंदू हृदय सम्राट यांचे स्वप्न साकार करून माननीय उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी तथा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तालुका प्रमुख उद्धवराव गोडे यांचे नेतृत्वात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा रुमाल व शाल श्रीफळ घेऊन जंगी प्रवेश केला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उप सर्कल प्रमुख,सर्कल प्रमुख शाखा प्रमुखांना शिवसेना, युवा तथा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमासाठी याप्रसंगी नगरपंचायत चे सदस्य मदन राऊत,शिवसेनेचे माजी ता.प्र.चांदमल अहिर, उपाध्यक्ष अनिता दीपक दहात्रे ,आशिष डहाळे.उपतालुकाप्रमुख भगवान बोरकर,गणेश सरनाईक, मंगेश बोरकर, तसेच तालुक्यातील सर्कल प्रमुख शिवाजी खांबलकर, गजानन लहाने, राजू लेकुरवाळे, वसंत आंधळे, जगदीश ससाने, सुधाकर देशमुख, महिला आघाडी ता.प्र. संगीता कुटे, उपता.प्र.दुर्गा झींगुर्डे,श. प्र. सीमा लोखंडे, सौ.भुसारी सौ.पुरी, सौ.इंगळे, आधी आजी माझी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे यशस्वी संचालन शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे प्रा. अनिल बळी तर आभार प्रदर्शन भगवान बोरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व अल्पोपहारणे करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख उद्धव गोडे यांच्या नेतृत्वात स्वयंसेवक शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.