आदर्श असे निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेले धानोरा (विटाळी) दुर्गंधीयुक्त गाव बनलेले असून घराघरातील केरकचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
स्वच्छतेच्या विविध बाबीवर विचार करून शासन निर्मल ग्राम पुरस्कार देत असते. असा पुरस्कार धानोरा गावाला मिळालेला होता. परंतु पुरस्कार घेऊन व नंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज धानोरा या गावात स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असून सार्वजनिक शौचालयाचे पाणी रोड शेजारील शेतामध्ये सोडले जात आहे. या शेतामध्ये हे पाणी साचत असल्याने गावात नवीन येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत दुर्गंधीनेच होते. व गावकऱ्यांना तर या दुर्गंधीची सवय झालेली आहे असे दिसून येते. ज्या शेतात हे पाणी सोडले जात आहे त्या शेतीचे यामुळे नुकसान होत असून ह्या शेत जमिनीचा कस जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गावातला केरकचरा हा दलित वस्तीच्या बाजूला रस्त्यावर टाकला जात असल्याने हा कचरा विखुरलेल्या अवस्थेत दिसून येतो. त्यातच पावसामुळे हा कचरा भिजून यामुळे होणाऱ्या चिखलाने रस्त्याने चालताना नागरिकांना कसरतच करावी लागते. या साचलेल्या केरकचरा व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना विविध आजार, विकार, व साथीचे रोग होऊ शकतात मात्र ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असून यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते.