केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण २०२३, “सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज” व "सफाईमित्र सुरक्षित शहर" देशभरात राबविण्यात येत आहे.या अंतर्गतच सफाई कामगारांच्या क्षमता बांधणी च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका अमरावती मार्फत "स्वच्छ सर्वेक्षण २०२३", "सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियान" व "सफाईमित्र सुरक्षित शहर" अंतर्गत कामशाळा फाऊंडेशन,पुणे यांच्या वतीने गटार व सेप्टिक टाक्यांची प्रतिबंधात्मक साफसफाई विषयी कार्यशाळा अमरावती मनपा राजापेठ झोन येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती.यावेळी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. सीमा नैताम, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके व इतर मान्यवर उपस्थित होते.