जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने धामणगाव रेल्वे शहरातील माहेश्र्वरी भवन येथे सामुहिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी धामणगाव शहर तसेच तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल निलेश विश्वकर्मा यांना राख्या बांधले. भावा- बहिणीचे अतुट नाते जपण्यासाठी निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात दरवर्षी हजारोंच्या संख्येने महिला एकत्र येऊन रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करतात. निलेश विश्वकर्मा यांच्याप्रती महिला वर्गात आपला हक्काचा भाऊ म्हणून आगळे वेगळे नाते असून ते जपण्यासाठी महिलांचा उत्साह वाखाणण्योजोगा असतो. तब्बल दोन वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा सामुहित पातळीवर हा भावा बहिणीच्या प्रेमाचा उत्सव धामणगाव शहरात रंगला होता. हजारो महिला माहेश्वरी भवन येथे एकत्र येत निलेश विश्वकर्मा यांना बांधले राख्या निलेश विश्वकर्मा यांच्याकडून दरवर्षी रक्षाबंधनाची भेट दिली जाते. यावेळी समस्त बहिणींचे रक्षण करण्याचा विश्वास त्यांना देऊन सदैव भाऊ म्हणून त्यांच्या पाठिशी राहण्याचा संकल्प केला जातो. तसेच बहिणींकडून भावाचे रक्षण सदैव राखीच्या धाग्याच्या माध्यमातून केले जाते.