*खडिने भरलेला ओव्हरलोड हायवा पलटला*

कौसडी :-जिंतूर तालुक्यातील कौसडी-मंगरूळ तांडा रस्त्यावरून बोरी कडे जात असलेला खडीने भरलेला हायवा शुक्रवार दिं.19 ऑगस्ट रोजी पलटि झाला असुन सुदैवाने कुठलिहि जिवीत हानी झाली नाहि.

याबाबत माहिती अशी, कौसडी मंगरूळ रस्ता परिसरात (एमएच १२ बीएन ५७५५) क्रमांकाचा हायवा खडी भरून बोरीकडे येत असताना कौसडी

मंगरूळ तांडा रस्तावर अचानक पलटी झाला. यामध्ये चालकाने सावधानता बाळगून बाहेर निघाला.यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.चालक कसाबसा आपला जीव वाचवून बाहेर पडला. कौसडी परिसरात मोठ्या प्रमाणावर खड़ी मशीन असून, बोरी-कौसडी रस्त्यावरील शेतात खडीने भरलेला हायवा वेगाने धावत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण या ठिकाणी वाढले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी कौसडी ग्रामस्थांमधून होत आहे.कौसडी ते मंगरूळ तांडा हा शेत रस्ता असुन या रस्तावरुन बहुतांश शेतकरी गाडी बैलाने येजा करतात तसेच गुरे जनावरे हि या रस्तावरुन माळरानावर चरण्या साठी जातात त्यातच या वाहनाची मोठी रेलचेल सुरु झाली आहे.खडीने भरलेले ओहरलोड वाहने भरधाव वेगाने धावत असतात या मुळे शेतक-यांन मध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले आहे.