बीड प्रतिनिधी- बीडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात यापूर्वी असलेल्या आरटीओ अधिकाऱ्याच्या बोगस सह्या करून येथील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल्यांनी ूर्व अधिकार्याच्या बोगस सह्या करून एक जेसीबी वाहनाचे कागदपत्र तयार केलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी आरटीओ कर्मचारी आणि एका एजंट वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गैरप्रकाराचा पडदा पास झाला असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून या वरिष्ठ लिपिक देडवाल यांच्या कार्य काळामध्ये आणखी काही गैरप्रकार घडला आहे का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
भ्रष्टअधिकाऱ्यांमुळे नागरीकांची गैरसोय होत असल्याचे अनेक प्रकार यापुर्वी सुद्धा उघड झालेले आहेत . त्यात शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून चक्क एका जेसीबीचे बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी जुन्या आरटीओंच्या सह्या करुन ही कागदपत्रे तयार केली आहेत . ही कागदपत्रे तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही . येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल ह्या गेल्या वर्षभरापासून बीडमध्ये काम करत आहेत . त्यांच्या कालच्या प्रकारावरुन त्यांनी यापुर्वी सुद्धा असे गैरकामे केली असल्याची शक्यता आहे . यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे . त्यांनी यापुर्वी सुद्धा असे कामे केली असतील तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे . त्यांच्यावर कारवाई झाली तर यापुढे अशी गैरकामे होणार नाही . मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरुन वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल व एजंट सय्यद शाकेर यांच्यावर बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात कलम 409 , 420 , 120 , 468 , 471 कलमान्वेय गुन्हा नोंद करण्यात आला आहे . पुढील तपास बीड ग्रामिण पोलीस करत आहेत .