औरंगाबाद : (दीपक परेराव) गेल्या १८ वर्षांपासून प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी नविन औरंगाबाद श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील यांनी गजानन महाराज भवन येथे बैठक घेऊन सर्वानुमते २०२२ ची नदिन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी राजेंद्र दर्डा, डॉ. भागवत कराड मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. सतिश चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, श्रीकांत शेळके, नंदकुमार घोडेले, आ. कल्याण काळे या मान्यवरांच्या सहमतीने महत्वाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पा. यांनी कार्यकारणी जाहिर केली.

यावेळी महासंघाची बैठकीला मावळते अध्यक्ष बाळासाहेब सांळुके, अभिजीत देशमुख,राजू पाटील ,सुरेद्र कुलकर्णी, विजय वाघमारे,दत्ता गव्हाड पाटील राजाराम मोरे,अनिल विधाते पदाधिकारी व गणेशभक्त यांची उपस्थिती होती.

अध्यक्ष म्हणून निखिल कुलकर्णी, उपाध्यक्ष राकेश पवार, कार्याध्यक्षः हरचरणसिंग गुलाटी, स्वागताध्यक्ष संजय जोरले सचिवः रामेश्वर मानकापे पा., कोषाध्यक्ष दिपक पवार पा., सरचिटणीस अशोक दामले, सहसचिव सचिन मिसाळ पा. आदिंची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षः आ. आंबादास दानवे, आ. संजय शिरसाठ, आ. एम. एम. शेख, खा. इम्तियाज जलील, राजू वैद्य, पंकज भारसाखळे, नविनसिंग ओबेरॉय, विलासबापू औताडे, विलास शेळके, स्वागताध्यक्षः मानसिंग पवार, पदमाकर मुळे, अभिजीत देशमुख, राजेंद्र राठोड, बाळासाहेब गायकवाड, दिलीप थोरात, रघुनाथ हिवाळे पा.अर्जुन गायके, पंजाबराव तौर,संतोष खेंडके, बाळासाहेब हरबक, शंकर म्हात्रे,अजय डीडोरे, अशोक बादल, शिलेश भिसे,मनोज भारस्कर , सावरे , अशोक पगार, बाबुराव कवस्कर,रमेश दिसागज, विजय वाघमारे, गणेश सोनार ,नारायण पाटकर, विशाल डीडोरे, हशम पटेल, शिवा लुटे यांची नियुक्ती करण्यात आली.