शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक
यांचा केज, अंबाजोगाईत संवाद दौरा
प्रतिनिधी | बीड
दि.१९ : शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे शनिवारी (दि.२०) केज, अंबाजोगाई तालुका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेणार आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे केज तालुक्यातील मस्साजोग येथे शनिवारी सकाळी १० वाजता शिवसेनेचे नेते पंजाब देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. १०.३० वाजता केज येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी ११.३० वाजता शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता अंबाजोगाई येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बैठक घेणार आहेत. २ वाजता शहरातील मान्यवरांच्या भेटी घेतील. २.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तरी या दौऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे नेते केजचे पंजाब देशमुख, अंबाजोगाईचे अर्जुन वाघमारे यांनी केले आहे.
अनेकांचा होणार प्रवेश
शिवसेनेतील शिंदे गटात अनेकांचा प्रवेश होणार आहे. केज व अंबाजोगाई तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्यास ईच्छुक असून जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होतील.