विद्यार्थ्यांचा पाहिला गट निवासी प्रशिक्षणासाठी सप्टेंबर माहिन्यात हुबळीला रवाना होणार.गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षेतील गुणवत्तेच्या आधारावार शिष्यवृत्ती मिळणार.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
औरंगाबाद :- (दीपक परेराव) दि.१९ ऑगस्ट हुबळीस्थित देशपांडे फाउंडेशनची स्थापना अमेरिकेतील तंत्रस्नेही उद्योजक श्री गुरुराज (देश) देशपांडे आणि सौ. जयश्री देशपांडे यांनी २००७ साली केली. ही संस्था उत्तर कर्नाटक आणि तेलंगणात कौशल्य विकास, शेतीतंत्र सुधार आणि उदयोजकता विकास या क्षेत्रात गेले १५ वर्षे कार्यरत आहे.
देशपांडे फाउंडेशनच्या शाश्वत शेती उपक्रमाअंतर्गत पाण्याचे व्यवस्थापन, पिकाची निवड आणि जमिनीचा कस तपासणी अश्या विविध क्षेत्रातिल उत्तम पध्दतींचा वापर करायला शेतकर्यांना प्रशिक्षीत केले जाते. गेल्या काही वर्षात ७००० पेक्षा जास्त शेतकर्याच्या उत्पन्नात शेततळयाच्या माध्यमातून भरघोस वाढ झाली आहे. देशपाडे फाउंडेशच्या तंत्रामुळे अत्यंत कमी खर्चात तयार होणारे १ दशलक्ष शेततळे इ.स. २०२५ पर्यंत तयार करण्याचा संकल्प केला आहे.
देशपाडे फाउंडेशन संचालित हुबळी येथील निवासी प्रशिक्षण हे बहुराष्ट्रिय कंपन्यांना पदविधर विद्यार्थ्यांकडून अपेक्षित सॉफ्ट स्किल आणि अभ्यास विषयासंबंधी (डोमेन) कौशल्यात प्राविण्य देवुन रोजगारक्षम बनवते. यातील ९७% पेक्षा जास्त विद्यार्थी विविध आयटी आणि आयटी संबंधीत सेवा प्रदान करणार्या कंपन्यात रोजगार मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रशिक्षणाचा कालावधी महिने ते ४ महिन्यांचा असतो. आयटी संबंधीत सेवा क्षेत्रासाठी विद्यार्थी तयार करणारा "सुसंधी", अकाउंटन्सीसाठी कॉटील्य, आयटी क्षेत्रात रोजगार देणारा फुल स्टॉक डेव्हलपर, हे काही अभ्यासक्रम नोंदविणे गरजेचे आहे.
आमचा प्रमुख उपक्रम सहयोगातून परिणामकारकता या कार्यक्रमाअंतर्गत उत्तर कर्नाटक आणि तेलंगणाच्या प्रभावक्षेत्राबाहेर राबवण्याचा हा पहिलाच करार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळा सोबत करताना आम्हाला आनंद होत आहे असे प्रतिपादन देशपांडे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधीकारी श्री. विवेक पवार यांनी संस्थेचे सचिव आ. श्री. सातिष चव्हाण यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केले. ते पुढे म्हणाले कि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहा जिल्ह्यांतिल शैक्षणिक संस्थामधुन रोजगारक्षम तरुण उन्नत देश या उपक्रम राबवायला आम्ही उत्साहाने सुरुवात करत आहोत.
या सहयोग कराराअंतर्गत मराठवाड्यातील कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन व इतर क्षेत्रातील पदविधर आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षमता वाढवण्याची विशेष मोहिम देशपाडे फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे. देशपांडे फाउंडेशनच्या प्रशिक्षणानंतर दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सन्माननिय पगार देत असलेल्या बहुराष्ट्रिय कंपन्यातून रोजगार मिळाला आहे. हे विद्यार्थी बंगलौर, पुणे, आणि हैद्राबाद सारख्या शहरात कार्यरत आहेत. पुढील काळात देशपाडे फाउंडेशन शालेय विद्याथ्यांसाठी स्किल इन व्हिलेज आणि महाविद्यालयातुन ५व्या आणि 6 व्या सत्रात स्किल-प्लस उपक्रमही महाराष्ट्रात राबवणार असल्याचे श्री. विवेक पवार यानी सांगितले.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना श्री. सतिष चव्हाण म्हणाले, देशपांडे फाउंडेशन सोबत महाराष्ट्रातील पाहिला करार करताना मराठवाडयातिल पदविधर तरुणांच्या उज्वल भवितव्याबाबत आम्ही आशावादी आहोत, जागा मर्यादित असल्यातरीही मराठवाड्यातील कमीत कमी शंभर तरुण तरुणीची पहिली तुकडी सप्टेंबर माहिन्यात देशपाडे फाउंडेशने सामावून घ्यावी असा आमचा आग्रह राहील. आर्थिक दुर्बल गटातील विदयार्थ्याना प्रवेश परिक्षेतील गुणवत्तेवर शिष्यवृत्तीस पात्र होवून ५०% पर्यंत शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात येइल. प्रवेष प्रक्रियेबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, "पूर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २२ ते ३१ ऑगस्ट या काळात संस्थेच्या सर्व महाविद्यालयातून परिक्षा देण्याची सोय केली आहे. परिक्षेचे निकाल ५ सप्टेंबरला जाहिर करण्यात येतील. विद्यार्थी पुढील लिंक वापरून नोंदणी करू शकतील https://www.dfindia.or 81/29XqWZfSecE=S अधिक माहीतीसाठी श्री. प्रमोद हुक्केरी याना 9620140004 या क्रमांकावर संपर्क साधावा असे संयोजकांनी आवाहन केले आहे.