परळी (प्रतिनिधी( दि. 19 वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विभागाचे कार्यालय मार्केट पश्चिम बाजू पहिला मजला या ठिकाणी आज पासून जनसामान्य व कार्यकर्त्यासाठी सुरू करण्यात आले आहे आगामी निवडणुका तसेच पक्षाच्या विविध महत्वपूर्ण बैठका व चर्चा साठी व प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त महत्त्वाचे आहे शहराच्या मध्यवर्ती भागी असलेल्या अरुणोदय मार्केटमध्ये ते आजपासून सुरू करण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद नजरेसमोर ठेवून आतापासूनच कामाला लागावे निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो अशी माहिती मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी बोलताना दिली आहे जास्तीत जास्त सभासद नोंदणी व शाखा बांधणीच्या कार्यक्रम प्रत्येक तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांनी हाती घ्यावा असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पाटील उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे मुख्य अतिथी भगवंत वायबसे स्वागत अध्यक्ष युवक अध्यक्ष मिलिंद घाडगे महासचिव गौतम आगळे, महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर पुरुषोत्तम वीर बालाजी जगतकर संजय रोडे बालासाहेब जगतकर सचिन उजगरे बाबुराव मस्के धनराज सोनवणे राजे सर्वदे विष्णू मुंडे ज्ञानेश्वर गीते गफारशहा खान प्रेम जगतकर तसेच शहर पदाधिकारी तालुका पदाधिकारी व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीला पूर्व भागात हक्काचे मुख्य मार्केटमध्ये कार्यालय मिळाले आहे याचा फायदा जनतेच्या सेवेसाठी व पक्ष वाढीसाठी करावा या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची समस्येत भाषणे झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट संजय रोडे यांनी केले तर आभार गफार शाखा पठाण यांनी मानले.