ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी 

फुलंब्री शहरात असलेलं ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा मनमानी कारभार,चालत असून ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक त्यांना पाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे.

फुलंब्री तालुक्यातील 93 गावाचा समावेश असून तालुक्यात मोठं मोठे हॉस्पिटल असून सर्वसामान्य रुग्ण मात्र आजही प्राथमिक आरोग्य केंद्र,तसेच फुलंब्री येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेत असतात,मात्र फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर हे वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप,रुग्ण करीत आहे.ओपीडी ची वेळ ही 8:30 वाजेची असून डॉक्टर आपल्या वेळेनुसार रुग्ण तपासणी साठी येतात,दररोज या ठिकाणी 100 ते 150 रुग्ण तालुक्यातील विविध गावातून उपचारासाठी याठिकाणी येत असतात,मंगळवार बाजार चा दिवस असल्याने रुग्णाच्या संख्येत सुद्धा वाढ होते,मात्र एवढं सगळं होत असताना डॉक्टर ओपीडी साठी वेळेवर येत नाही,त्याच प्रमाणे डॉक्टरांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना,डॉ औरंगाबाद येथून ये जा करतात.तसेच या ठिकाणी तीन वैदयकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असून वेद्यकीय अधिकारी दोन दोन दिवस आपले कर्तव्य पार पाडत असल्याचं समोर आलं आहे.प्रशासनाने याठिकाणी कोटयावधी रुपये खर्च करून प्रशस्त अशी इमारत बांधली आहे,यात मुख्यालयी राहण्यासाठी सर्व सुविधा युक्त अशी कॉटरस बांधण्यात आली आहे मात्र हे सर्व नाम मात्र असून शासनाने नुकताच मुख्यालयी राहा नाहीतर तीन वर्षसाठी वेतनवाढ रोखणार असे जाहीर केले,मात्र अद्याप पर्यंत कोणावर कारवाई न झाल्याने हे फक्त कागदोपतत्रिच असल्याचं दिसून येत आहे,शासकीय कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पाठीशी घालत असून त्यामागे त्याचे लागेबांधे असल्याचं बोलले जात आहे.

सदरील ग्रामीण रुग्णालय हे रेफर सेंटर होत असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्धी माध्यमाने प्रसिद्ध केल्या होत्या,मात्र मुजोर अधिकारी यांना वरिष्ठ अधिक्काऱ्यांची पाठराखण असल्याने त्यांना त्याचा काही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे,त्याच प्रमाणे ग्रामीण रुग्णालयात रुग्णकल्याण नियामक समिती असून ती समिती नेमण्यात आली मात्र त्यावरील सदस्यांनी कधी परिस्थिती जाणून घेतल्याची तसदी दिसत नाही,यामुळे ही समिती असून नसून असल्या सारखी आहे.याठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अभिजित खनदारे यांना रुग्णालयात अशा प्रकार घडत आहे असे विचारले असता ते म्हणाले याबाबत मला काहिच माहीत नाहीये मग जवाबदार अधिकारी म्हणूम हे फक्त ऑफिस मध्ये येऊन बसतात का,की या ठिकाणी असलेल्या वेद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घालून आपले सुत तर जुळवत नसतील ना असा प्रश्न निर्माण होतो आहे,दि 18 रोजी याठिकाणी फुलंब्री येथील एका 16 वर्षीय युवकांचा सकाळी 10 वाजता बुडून मृत्यु झाला होता,नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यु झाला होता.त्यांनतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तब्बल 4 तास त्याठिकाणी डॉक्टरच्या नाकर्तेपणामुळे अडकून पडला होता, सदरील पोलीस स्टेशनला पाठवलेली mlc चुकीची गेल्याने पुन्हा सुधारित करून देण्यासाठी नातेवाईकांना जावं लागलं,याठिकाणी एवढा भोंगळ कारभार चालू असून कोणीही वरिष्ठ अधिकारी याकडे का लक्ष देत नाही,यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे का यामुळे आपला मनमानी कारभार करत आहे,