फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवरील असलेल्या संचालकांचा कार्यकाळ संपल्यामुळे बाजार समितीवर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक विष्णू रोडगे यांनी बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कालावधी यापूर्वीच संपला होता. मात्र, मागील गेल्या तीन वेळेस प्रशासनाने कार्यकारी संचालक मंडळाचा कार्यकाळ वाढवून दिला होता. कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने कार्यकाळ वाढविला होता. आता कोरोनाचे संकट नसल्यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच विविध कार्यकारी

सोसायटीच्या निवडणुकाही घेण्यात आलेले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ १५ ऑगस्ट २०२१ ला संपला होता. याआधी कोरोनाचे कारण पुढे करून निवडणूक लांबविण्यात आली होती. गेल्या एका वर्षात विद्यमान संचालक मंडळांना प्रत्येकी ४ महिने असे एकूण तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. वास्तविक पाहता ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुका घेण्यात आल्या. पण मोजकेच मतदार निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. या कार्यकारी मंडळाला देण्यात आलेली तिसरी मुदत १५ ऑगस्ट २०२२ संपली असल्याने पणन विभागाने या बाजार समितीवर सहायक निबंधक रोडगे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली.