औरंगाबाद :- दि.१९ (दीपक परेराव) मराठा समाजाचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा संपुर्ण आयुष्य मराठा आरक्षणासाठी अहोरात्र झटणारे, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, मराठा समाजाचे कैवारी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती चे अध्यक्ष स्व.आमदार विनायकराव मेटे यांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती महाविद्यालय एन -3 सिडको औरंगाबाद येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील मराठा आरक्षण मोर्चाचे समन्वयक तसेच मराठा समाज संघटना,छावा संघटना,छावा श्रमिक संघटना, बुलंद छावा संघटना,झुंजार छावा संघटना शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँगेस पार्टी,महाराष्ट्र् नवनिर्माण सेना, बळीराजा शेतकरी संघटना,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नेते यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद शिवसंग्राम पक्षाच्या वतीने करण्यात आले होत.यावेळी यावेळी किशोर चव्हाण,सचिन मिसाळ, आप्पासाहेब कुढेकर, किशोर चव्हाण,संजय तायडे,किशोर शितोळे, जे.के.जाधव,सुमित खांबेकर,अडव्हॉकेट श्रीकांत कडवे, प्रा.शिवानंद भानुसे,सुनील कोटकर, डॉ.कांचनकुमार चाटे,गोविंद केंद्रे सर ,निलेश ढवळे,सुनील औटे, राजेंद्र पवार ,गणपत म्हके,राजेंद्र दानवे, शिवाजी साळुंके,मनोज गायके, चंद्रकांत भराट, विठ्ठलराव जाधव,दीपक पवार,सतीश वेताळ, मच्छिन्द्र देवकर,लक्ष्मण नवले, गणेश उगले ,शैलेश भिसे,संकेत शेटे, संतोष काळे,अजय काकडे, उमाकांत माकने,सौ.सुकन्या भोसले,सुवर्णा पाटील, डॉ.दिव्या पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद शिवसंग्राम पक्षाच्या वतीने करण्यात आले होते.