यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढवले आहे.

डांभूर्णी, ता.यावल येथील अल्पवयीन मुलीला गावातीलच संशयीत निलेश काशीनाथ कुंभार या तरुणाने फुस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी अल्पयीन मुलगी यावल पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिने संशयीत निलेश कुंभार याने गुजरात राज्यातील सुरत येथे नेत अत्याचार केल्याची माहिती दिली तसेच त्यानंतर बुधवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ सोडून पळ काढल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को व लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले.