वाघोली-लोहगाव चौकात वाहनांची होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीसाची नेमणूक करण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. वाघोली येथील लोहगाव चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. लोहगाव रस्त्यावर अनेक सोसायटी, नागरीवस्तीसह अनेक शाळाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला भावडीकडे जाणारे अनेक खडी, क्रश सँडसह इतर जड वाहतूक करणारी अनेक वाहने ये-जा करतात. त्यामुळे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी येण्यासाठीही दोन तास लागत असल्यामुळे पालकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत असे. या सर्व बाबींमुळे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा संघटन सचिव व वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव यांनी पदाधिकार्यांसह सहायक पोलिस निरीक्षक जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी वाघोली-लोहगाव चौकात वाहनांची होणारी कोंडी टाळण्यासाठी लोहगाव चौकात एक वाहतूक पोलीसाची तातडीने नेमणूक करण्याची विनंती केली. यावेळी आव्हाळवाडी गावचे माजी सरपंच हेमंत सातव, अविनाश सातव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરતમાં અરવિંદ કેજરીવાલના રોડ શોમાં પથ્થરમારો થતા ભાગદોડ
લઈને રાજકારણ ગરમાયુ છે. ત્યારે સુરતમાં સુરતમાં દિલ્લીના મુખ્યમંત્રી અરવિંદ કેજરીવાલના રોડ શોમાં...
অসমীয়া গহনাৰ জনপ্ৰিয় প্ৰতিষ্ঠান ডুগডুগী ৰ সৰ্বশ্ৰেষ্ঠ ১২গৰাকী গ্ৰাহকলৈ আকৰ্ষণীয় উপহাৰ।ৰাজ্যৰ মেকআপ আৰ্টিষ্টলৈও বিশেষ অফাৰ।
১৫টাকৈ ৰাষ্ট্ৰীয় আন্তঃৰাষ্ট্ৰীয় বঁটা প্ৰাপক শুদ্ধ অসমীয়া গহনাৰ জনপ্ৰিয় প্ৰতিষ্ঠান...
कंटेनर पलटी होऊन पाच जखमी..
"पैठण तालुक्यातिल आडगाव जावळे शिवारातील घटना"
कंटेनर पलटी होऊन पाच जखमी..
"पैठण तालुक्यातिल आडगाव जावळे शिवारातील घटना"
पाचोड(विजय चिडे)...
ઢાંકી પમ્પીંગ સ્ટેશનમાં ત્રણ દિવસમાં બીજી લાશ મળી આવતા ચકચાર
લખતર તાલુકાના ઢાંકી ગામ પાસે પંપીંગ સ્ટેશન પાસે કેનાલમાં તરેલી હાલતમાં મૃતદેહ મળી આવ્યો...
নাজিৰা নাওশলীয়া গাঁৱত নিশা ভয়ংকৰ কাণ্ড, সোপাধৰাৰ সন্দেহত এজনক প্ৰাণে মৰাৰ চেষ্টা কৰাৰ অভিযোগ
নাজিৰা নাওশলীয়া গাঁৱত নিশা ভয়ংকৰ কাণ্ড, সোপাধৰাৰ সন্দেহত এজনক প্ৰাণে মৰাৰ চেষ্টা কৰাৰ অভিযোগ...