गणेश कॉलनीतील कला भवन येथे ७० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील कला भवन येथे बुधवार १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका ७० वर्षीय वृध्दाचा मृतदेह बेवारसरित्या आढळून आला. परिसरातील नागरीकांनी यासंदर्भात जिल्हापेठ पोलीसांनी कळवून याबाबत माहिती देण्यात आली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोहेकॉ फिरोज तडवी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटवावी असे आवाहन जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पेालीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी केले आहे.