माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांना जिल्हा प्रशासनाकडून विनम्र अभिवादन

गडचिरोली,()दि.18: माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

       यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर आशिष सोरते, आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी सर्वांनी सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली.