औरंगाबाद:- (दीपक परेराव )इंजिनियरिंग व एम सी ए झालेल्या विद्यार्थी साठी क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस मध्ये उद्योगात असलेल्या विविध संधी या विषयावर आधारित औरंगाबाद येथील एम सी ई डी मुख्य कार्यालयात परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्टी प्रकल्प अधिकारी योगेश सोनवणे यांनी बार्टीची प्रशिक्षनातील भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.तर एम सी ई डी प्रशासकीय अधिकारी डॉ.अभिराम डबीर यांनी उद्योगातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातील ट्रेनर सतीश भालशंकर यांनी क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस विषयी संधी व बारकावे समजून सांगितले तर या शेत्रातील उद्योजक प्रविण घरांडवांल यांनी संधी व संघर्ष या विषयावर मार्गदर्शन केले.तर रविकुमार कळसाईतकर उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा निमकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुरवडे मॅडम,बार्टी व एम सी ई डी टीम यांनी प्रयत्न केले